आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपचे आयोजन यंदा भारतात होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी होणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. भारताने आशिया कपसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता.आता पाकिस्तानकडून धमकी दिली जात आहे की वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा या प्रश्नाचा चेंडू सरकारच्या कोर्टात टोलावला. पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ सहभागी होण्याबाबत शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, सरकारच्या मंजुरीवर सगळं अवलंबून आहे
नजम सेठी यांचे वक्तव्य आश्चर्यजनक आहे कारण आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांच्यासह सर्वांनी पीसीबी प्रमुखांनी दिलेल्या आशिया कपच्या हायब्रिड मॉडेलच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सेठी यांनी म्हटलं की, भारत आणि पाकिस्तानचा जो मुद्दा आहे त्यात पीसीबी किंवा बीसीसीआय काही निर्णय घेऊ शकत नाही. यात संबंधित देशांचे सरकारच काय करायचं हे ठरवू शकते.
याप्रकरणी आमच्या सरकारला ठरवायचं आहे. जेव्हा भारताचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे सरकार ठरवते की कुठे खेळायचं. आम्हाला हे विचारण्याने काहीच साध्य नाही होणार की आम्ही अहमदाबादमध्ये खेळणार की नाही. वेळ आल्यावर हे ठरेल. सरकार सांगेल आम्ही कुठं खेळू शकतो. आमचा निर्णय त्यावरच अवलंबून आहे असंही सेठी म्हणाले.
भारत-पाक अहमदाबादमध्ये लढणार? PCB प्रमुखांनी झटकले हात, सरकारच्या कोर्टात चेंडू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -