Sunday, November 3, 2024
Homenewsदिल्ली कॅपिटल्सला सहावा झटका, अक्षर पटेल बादआयपीएल फेज -2

दिल्ली कॅपिटल्सला सहावा झटका, अक्षर पटेल बादआयपीएल फेज -2

मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीचे सलामीवीर मैदानात फलंदाजीसाठी उतरले पण पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यांना पहिला झटका बसला.
दिल्लीची चांगली सुरुवात, पण ८९ धावांत निम्मा संघ तंबूत परतला…
शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथने पहिल्या विकेटसाठी ३५ धावा जोडल्या. चांगल्या लयीत दिसणाऱ्या शिखर धवनची (२४) विकेट लॉकी फर्गसच्या खात्यात आली. व्यंकटेश अय्यरने झेल पकडला.
बाद होण्यापूर्वी ऑरेंज कॅप पुन्हा एकदा शिखरकडे पोहोचली आहे. आतापर्यंत गब्बरने ४५४ धावा केल्या आहेत. शिखरच्या विकेटनंतर श्रेयस अय्यरची (१) जादू आजही दिसली नाही. सुनील नरेनने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कोलकाताला स्टीव्ह स्मिथ (३९) च्या रूपात तिसरे यश मिळाले. फर्गसनेने स्मिथला क्लीन बोल्ड केले. यानंतर ९ चेंडूंच्या अंतराने हेटमायरही बाद झाला. वेंकटेश अय्यरने त्याला माघारी धाडले. हेटमायरने ५ चेंडूत ४ धावा केल्या.
१४ व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर ललित यादव बाद झाला. त्याला शुन्यावर सुनिल नरेनने तंबूचा रस्ता दाखवला.
१५ व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर अक्षर पटेल बाद झाला. वेंकटेश अय्यरने त्याचा अडसर दूर केला. अक्षरने शुन्यावर बाद झाला.
कोलकाता संघात २ बदल
कोलकात्याने संघात २ बदल केले. जखमी आंद्रे रसेलच्या जागी टीम साऊदी आणि प्रशांत कृष्णाच्या जागी संदीप वॉरियर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर दिल्लीने जखमी पृथ्वी शॉच्या जागी स्टीव्ह स्मिथला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
मॉर्गन अँड कंपनीसाठी महत्त्वपूर्ण सामना…
दिल्ली कॅपिटल्सने १० सामन्यांत १६ गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स १० सामन्यांत ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सध्या कोलकातासह इतर तीन संघांचेही ८-८ गुण आहेत. या दृष्टीने हा सामना कोलकातासाठी अधिक महत्त्वाचा आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन:
शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, अवेश खान.
केकेआर प्लेइंग इलेव्हन-
शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, टीम साउदी, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -