Monday, April 22, 2024
Homeक्रीडाअजिंक्य रहाणे याची गगनभरारी,टीम इंडियात अखेर ती जागा मिळवलीच

अजिंक्य रहाणे याची गगनभरारी,टीम इंडियात अखेर ती जागा मिळवलीच

बीसीसीआयने आगामी वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवाला विसरून आता विंडिज दौरा करणार आहे. अवघ्या काही दिवसांनी 12 जुलैपासून भारताच्या या दौऱ्याला सुरवात होणार आहे.

कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 असा भरगच्च हा दौरा असणार आहे. बीसीसीआयने या 3 पैकी पहिल्या 2 म्हणजेच कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विटद्वारे याबाबत माहिती दिलीय.अजिंक्य रहाणे याच्याकडे मोठी जबाबदारी
बीसीसीआय निवड समितीने अजिंक्य रहाणे याला विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मोठी जबाबदारी दिली आहे.

रहाणे जवळपास गेल्या दीड वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर होता. मात्र रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून एन्ट्री झाली. रहाणेने या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढाऊ खेळी केली. त्यानंतर आता रहाणेला विंडिज विरुद्धच्या या टेस्ट सीरिजसाठी उपकर्णधार करण्यात आलं आहे.टीम इंडियाचं उपकर्णधारपद हे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होतं. आता ती जबाबदारी रहाणे पार पाडणार आहे. रहाणे याच्याकडे आधी टीम इंडियाचं पूर्णवेळ उपकर्णधारपद होतं. त्यानंतर रहाणेने कॅप्टन्सीही केली. मात्र रहाणेला काही सामन्यांमधील अपयशामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र रहाणेने न खचता आपल्या उपयुक्तता दाखवून दिली. रहाणेने निवड समितीला आपल्यासमोर झुकायला भाग पाडलंय.

वेस्टइंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी अशी आहे टीम इंडियावेस्टइंडिज दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया
|रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टेस्ट सीरिज वेळापत्रक
विंडिज विरुद्ध टीम इंडिया, पहिली कसोटी, 12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका

विंडिज विरुद्ध टीम इंडिया, दुसरी कसोटी, 20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -