वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळालं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वी जैस्वालला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला वनडे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांचंही वनडे संघात पुनरागमन झालं आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचीही वनडे संघात निवड झाली आहे.वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
12 जुलैपासून विंडीजचा दौरा
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे, तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून होणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक –
कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)
12 ते 16 जुलै 2023 : पहिला कसोटी सामना
ठिकाण : विंडसर पार्क, डोमिनिका
20 ते 24 जुलै 2023 : दुसरा कसोटी सामना
ठिकाण : क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद
वनडे सामने – (संध्याकाळी सात वाजता)
27 जुलै 2023 : पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
29 जुलै 2023 : दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
1 ऑगस्ट 2023 – तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकॅडमी, त्रिनिदाद