Saturday, July 27, 2024
Homeसांगलीहे सरकार जाहिरातीचे सरकार', भाजपला धडा शिकवण्याचा संकल्प; सांगलीत महानिर्धार मेळाव्यात काँग्रेस...

हे सरकार जाहिरातीचे सरकार’, भाजपला धडा शिकवण्याचा संकल्प; सांगलीत महानिर्धार मेळाव्यात काँग्रेस नेत्यांचा एल्गार

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार यश मिळवताना भाजपचा दारुण पराभव केला. या विजयानंतर शंभर हत्तींचे बळ मिळालेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धर यांचा आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून सांगलीमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सांगलीतील काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याकडून करण्यात आलं. सिद्धरामय्या यांचा नागरी सत्कार तसेच काँग्रेस महानिर्धार मेळावाही पार पडला.

या मेळाव्यामध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली. कर्नाटकचे यशस्वी सूत्र आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवू
आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये विजय निश्चित असल्याचे विश्वास यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे असाही दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की, कर्नाटकचे यशस्वी सूत्र आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवू आणि हे भाजपचे शेतकरीविरोधी सत्कार उलथवून टाकू. सिद्धरामय्या यांची पार पडणारी सभा ही महाराष्ट्रातील परिवर्तनाची नांदी आहे, महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय निश्चित आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपला धडा शिकवणुकीचा संकल्प
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भाजपवर सडकून टीका केली.

ते म्हणाले की, आदिपुरुष चित्रपटाच्या माध्यमातून बजरंग बलीचा अपमान करण्याचे पाप भाजपकडून करण्यात आले. आता त्यांच्यासोबत बजरंग बली सुद्धा नाही आणि श्रीराम देखील नाही. राज्यातील असंवैधानिक सरकारने वारकऱ्यांवर लाठीचार्जच करायला लावला. पंढरपूरमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पांडुरंगाचा अपमान करण्याचं काम केलं आहे. हे सरकारी जाहिराती सरकार असून जाहिरात करून पंढरपूरमध्ये तापमान महाराष्ट्र आणि देवाचा अपमान केला आहे अशी टीका त्यांनी केली. पांडुरंगाचा अपमान सहन करून केला जाणार नाही. भाजपला धडा शिकवणुकीचा संकल्प काँग्रेसने केला आहे.

भाजप सरकारकडून लोकशाहीची गळचेपी सुरू
दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही महाराष्ट्रात येणारे सरकार आपलंच राहणार असल्याची खात्री दिली. राज्यातील सरकारकडून फक्त घोषणा सुरू आहेत. प्रत्यक्षात मात्र, काम कोणतेही केलं जात नाही. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. फक्त जाहिरातींवर खर्च सुरू आहेत.

केवळ जाहिरातीतून खोटा प्रचार सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून राज्यघटनेचे काय होणार? याची भीती वाटते. भाजप सरकारकडून लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याची टीका थोरात यांनी केली. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात अन्यायाची भावना होऊ नये, असे आवाहनही सिद्धरामय्या यांना बाळासाहेब थोरात यांनी केले. विश्वजीत कदम यांनीही आपल्या भाषणात बोलताना मराठी भाषिकांना न्याय देण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -