Tuesday, November 28, 2023
Homeब्रेकिंगपश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार फटका, एक नेता पक्षातून पडणार बाहेर

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार फटका, एक नेता पक्षातून पडणार बाहेर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रात बळकट आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाची ताकत आहे. पण पुढच्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात झटका बसू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात पंढरपूरमधील एका मोठ्या स्थानिक नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंढरपूरात निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काही प्रमाणात कमी होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील नेते भागीरथ भालेक पक्षामध्ये अस्वस्थ असल्याच्या मागाच्या काही दिवसांपासून बातम्या येत होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

या पक्षात करणार प्रवेश
भागीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय पक्का केलाय. ते येत्या 27 जूनला भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करणार आहेत. भारत राष्ट्र समिती म्हणजे BRS. बीआरएसने तेलंगणनंतर आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. बीआरएसने आता पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रीत केलय.

काय घोषणा केली?

सध्या तेलंगणमध्ये BRS ची सत्ता आहे. बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत येत्या 27 जूनला भागीरथ भालके तेलंगण राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करतील. आज पंढरपुरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली.

भागीरथ भालके काय म्हणाले?

“अडचणीच्या काळात प्रमुख नेता गेल्यानंतर आमच्या पाठिशी ज्या पद्धतीने उभं रहायला पाहिजे होतं, तसं कोणी राहिलं नाही. आमच्यावरच टिकाटिप्पणी झाली, त्यामुळे नक्कीच स्वाभिमानाला ठेच लागली. आम्ही जनभावनेचा आदर करुन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असं भागीरथ भालके म्हणाले.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र