ताजी बातमी ऑनलाईन टीम
टीम इंडियाचा कर्णधारपदावर बीसीसीआयने बदल करून पाहिला पण यश काही आलं नाही. विराट कोहली याच्याकडे कर्णधारपद असताना भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यानंतर विराट कोहली याच्याकडून हे कर्णधारपद काढून घेत रोहित शर्माकडे देण्यात आलं. त्यानंतर रोहित तिन्ही संघाचा कर्णधार झाला पण त्यालाही विशेष काही छाप सोडता आली नाही.
रोहितकडे आता वन डे वर्ल्ड कप 2023 जिंकण्याची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार हा निश्चितपणे बदलणार यात काही शंका नाही. अशातच यावर माजी कोच रवी शास्त्री यांनी नव्या कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
कोण आहे तो खेळाडू?
रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणत्या खेळाडूकडे सोपवायची. याबाबत बोलताना, रवी शास्त्री यांनी कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याकडे जबाबदारी सोपवावी असं म्हटलं आहे. 2022 च्या T-20 वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या T20 संघाचा कर्णधार आहे.
लवकरच रोहितची कर्णधारपदावरुन उचलबांगडी, ‘हा’ खेळाडू सांभाळणार जबाबदारी, माजी हेड कोचने नाव सांगितल्याने खळबळ!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -