ताजी बातमी ऑनलाईन टीम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात परिवारावरून वाद सुरु आहे. या परिवार वादावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज दिले आहे. माझ्या परिवाराबद्दल काही असेल तर बाहेर काढून दाखवा, असं आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
चंद्रपुरातील सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले. अलमारीत सांगाडे असणाऱ्यांनी सावकारीचा आव आणू नये. सांगाडे बाहेर काढू, असा थेट इशाराही फडणवीसांनी दिला. एवढंच नव्हे तर फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडला तर सोडत नाही, असंही त्यांनी बजावले.
परिवारवादावरुन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरेंना त्यांनी ट्विटमधूनच उत्तर दिलं होते. या ट्विटला मिळालेल्या पाठिंब्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम तुटले आहेत असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर खोचक टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी काय ते समजून घ्यावं असा सल्लाही त्यांनी दिला होता.
पाटण्यातली बैठक हा मोदी हटाव नव्हे तर परिवार बचाव मेळावा असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. जर मला बोलावं लागलं तर तुम्हाला शवासन करावं लागेल असा इशाराच आता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला होता.तर ठाकरेंनी पातळी सोडल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती.
सांगाडे बाहेर काढू… परिवारावरून वाद पेटला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -