Saturday, July 27, 2024
HomeइचलकरंजीIchalkaranji News तीन चोरट्यांना अटक! पाच गुन्हे उघडकीस

Ichalkaranji News तीन चोरट्यांना अटक! पाच गुन्हे उघडकीस

गस्त घालत असताना दुचाकीसह मिळून आलेल्या संशयीतांकडे कसून तपास केला असता वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले. पोलिस रेकॉर्डवरील चैतन्य माळी या गुन्हेगारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. शुभम कोणे आणि अर्जुन निवाते अशी संशयीतांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांकडून चोरीच्या पावणेदोन लाखाच्या सहा दुचाकी तर एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ दुचाकी हस्तगत केली आहे. अटक केलेल्या संशयीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरचे पोलीस गस्त घालत असताना नदीवेस जॅकवेल रोडवर चैतन्य माळी, शुभम कोणे आणि अर्जुन निवाते हे दुचाकीसह सहा दुचाकी हस्तगत
संशयास्पदरित्या पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केली असता ती चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा तिघांकडे कसून चौकशी केला असता त्यांनी इचलकरंजी, शहापूर, कुरूंदवाड आणि कर्नाटकातील सदलगा येथून सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अटक केलेल्या चोरट्यापैकी चैतन्य माळी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे.

संशयीतांकडे अधिक तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी वर्तवली. या कारवाईत उपनिरीक्षक मनोज पाटील, सुनिल बाईत, गजानन बरगाले, विजय माळवदे, सतिश कुंभार, पवन गुरव, अरविंद माने, प्रविण कांबळे, अंकुश कुंभार, आशिष मादनाईक सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -