Sunday, September 8, 2024
Homeसांगलीकर्ज फेडण्याच्या तगाद्याला कंटाळून युवकाची आत्महत्या! Sangli Crime

कर्ज फेडण्याच्या तगाद्याला कंटाळून युवकाची आत्महत्या! Sangli Crime

घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार तगादा लावून मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील एका फायनान्स कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आत्महत्येची घटना ही दि. ८ एप्रिल २०२३ रोजी शहरातील श्रेयस लॉज येथे घडली होती. विशाल सुरेश दबडे ( वय ३६) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीमती सुनीता सुरेश दबडे (वय ५० रा. बोलवाड, मिरज) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सातारा जिल्ह्यातील एमडीपी फायनान्स कंपनीच्या तिघांविरधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरी मॅडम (पूर्ण नाव नाही), प्रियांका रासकर आणि ओम प्रकाश जाधव (सर्व रा. पिरवाडी जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत विशाल दबडे हे मूळचे मिरज तालुक्यातील बोलवाड येथील रहिवाशी आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते बस स्थानक परिसरातील मॉडर्न बेकरी समोर असणाऱ्या श्रेयस लॉज येथे काम करत होते. याच ठिकाणी ते राहत असत. शनिवार दि. ०८ एप्रिल रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लॉज मध्ये असणाऱ्या रूम मधील बाथरूम मध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.

घडलेल्या या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला होता. घटनेच्या दोन महिन्यानंतर मृत विशाल यांची बहीण सुनीता दबडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावून मृत विशाल दबडे यांना मानसिक त्रास दिल्याचे उघड झाले. यानंतर शहर पोलिस ठाण्यात सातारा जिल्ह्यातील पिरवाडी येथील एमडीपी फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -