Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगKCR यांच्या एंन्ट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष टार्गेटवर

KCR यांच्या एंन्ट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष टार्गेटवर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह अख्ख्या मंत्रिमंडळ महाराष्ट्रात तळ ठोकून आहे. चंद्रशेखर राव यांच्या एंन्ट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनानिमित्ताने आलेल्या चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात मोठं शक्तिप्रदर्शन केले आहे. राष्ट्रवादीनंतर महाराष्ट्रातील आणखी एक मोठा पक्ष चंद्रशेखर राव यांच्या टार्गेटवर आहे. बीआरएस महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची मोठी घोषणा देखील चंद्रशेखर राव यांनी केली आहे. चंद्रशेखर राव यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापणार आहे.

भारत परिवर्तन हेच आमचे काम. आमचा एकच उद्देश तो म्हणजे देश परिवर्तन. तुम्ही काँग्रेसला, भाजपाला संधी दिली आता आम्हाला द्या. आम्ही बदल घडवू असं म्हणत चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR राव यांची भाजप नगरसेवक नागेश वल्याळ यांना BRS पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. भाजप नगरसेवक नागेश वल्याळ हे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील पाहिले खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आहेत. राव यांनी भाजपचे दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वल्याळ यांचे पुत्र, भाजप नगरसेवक नागेश वल्याळ हे बीआरएस मध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. के सी आर राव यांनी घरी आल्यानंतर मला बीआरएस पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे वल्याळ म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -