Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगभयानक अपघात; कारच्या धडकेत स्कुटीचे 3 तुकडे

भयानक अपघात; कारच्या धडकेत स्कुटीचे 3 तुकडे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव कारने स्कुटीला धडक दिली. यानंतर कारने पादचाऱ्याला धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, पादचारी जखमी झाला आहे. अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त कार रस्त्यावर सोडून तरुण-तरुणी फरार झाले. हा अपघात इतका भीषण होता स्कुटीचे तीन तुकडे झाले आहेत.

मुलुंडच्या देवी दयाल रोड परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. हिट अँड रनची ही घटना आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुलुंडच्या देवी दयाल गार्डन परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सुरुवातीला स्कुटी चालकाला उडविले त्यानंतर याच परिसरातून रस्त्याच्या कडेने नाईट वॉक करणाऱ्या एका नागरिकाला या कारने धडक दिली. यातनंतर ही कार थेट गुरुकृपा बिल्डिंगच्या गेटवर जाऊन धडकली.

या अपघातानंतर कारमध्ये असलेले दोन तरुण आणि एक तरुणी घटनास्थळावरून फरार झाले. तर, एक तरुणी पळण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी तिला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या चौघांनी अमली पदार्थाचं सेवन केलं असल्याचं प्रत्यक्ष दर्शन कडून सांगण्यात येत आहे. कारची धडक इतकी भीषण होती की स्कुटीचे तीन तुकडे झाले आणि स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -