Tuesday, August 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातील १० शाळा अनधिकृत

कोल्हापूर जिल्ह्यातील १० शाळा अनधिकृत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर शहराबरोबर ग्रामीण भागात तब्बल १५ शाळा शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ मध्ये बंद केल्या आहेत. यावर्षी या शाळा अनधिकृतपणे सुरु केल्या असल्यास या शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये अन्यथा त्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी अशा उबाळे यांनी केले आहे.

या सर्व शाळांवर शिक्षण विभागाकडून दंडात्मक कार्यवाही सुरु आहे. संबंधित अनधिकृत शाळा सुरु राहिल्यास संबंधित व्यवस्थापनास १ लाखाचा दंड व सुचना देवूनही शाळा बंद न केल्यास प्रति दिवस दहा हजाराचा दंड ठोठाविण्यात येणार आहे. पालकांनी अशा अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये, अन्यथा पाल्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ही जबाबदारी पालकांची राहील. असेही शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी स्पष्ट केले आहे.

अनधिकृत शाळेंची नावे खालील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील ओम पब्लिक स्कूल कुंभोज, समर्थ इंग्लिश स्कूल, संभापूर, आयडिल सेमी इंग्लिश स्कूल, इंगळी महादेव तातोबा गाताडे प्राथमिक विदयालय इंगळी. शाहूवाडी तालुक्यातील : शामराव दाभाडे आश्रमशाळा मौजे चनवाड बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूल, उकोली. चंदगड तालुक्यातील – गुरुकूल इंग्लिश मिडीयम स्कूल, तर्केवाडी, सनशाईन इंग्लिश स्कूल चंदगड. शिरोळ तालुक्यातील टॅलेंट इंग्लिश मीडियम स्कूल उमळवाड विद्याकुंज कोडिग्रे. कागल तालुक्यातील सेंट अॅन्स इंग्लिश मिडीयम स्कूल बाचणी व इंग्लिश प्रायमारी स्कूल व्हनाळी या अनधिकृत शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील एस.एन. खाडे करिअर अॅकडमी सातवे, आदित्य विद्या निकेतन पणारे, चंदगड तालुक्यातील प्रेमांगण इंग्लिश स्कूल -हेरे ही आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -