ताजी बातमी ऑनलाईन टीम
बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. सलमान खान हा सोशल मीडियावरही सक्रिय असून नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सलमान खान हा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान खान याला किसी का भाई किसी की जान या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, सलमान खान याच्या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.
सलमान खान याच्या किसी भाई किसी की जान या चित्रपटातून फक्त शहनाज गिल हिनेच नाही तर पलक तिवारी हिने देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान खान याच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
नुकताच सलमान खान याने एक फॅमिली फोटो शेअर करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खान याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची आई, वडील, भाई आणि बहीण दिसत आहेत. सलमान खान याचे आई वडील, सोहेल आणि बहीण हे सोप्यावर बसलेले दिसत आहेत. सलमान खान अरबाज आणि अर्पिता हे मागे उभे राहिलेले दिसत आहेत.
हा खास फोटो शेअर करत सलमान खान याने कॅप्शनमध्ये लिहिले की, Eid-Ul-Adha मुबारक आता सलमान खान याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सलमान खान याला ईदच्या शुभेच्छा दिल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये सलमान खान खूप आनंदी दिसतोय.
भाईजानने केली कुटुंबासोबत ईद साजरी, खास फॅमिली फोटो शेअर करत सलमान खान याने…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -