ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची 5 जुलै रोजी बैठक होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. यशवंतर चव्हाण येंटर येथे बैठक होईल. काहीनी स्वतः. मंत्री मंडळात जाण्याची भूमिका घेतील. पक्षाची मान्यता न घेता शपथ घेतली. ज्या सदस्यांन बोलवले त्यांनी सर्वानी शरद पवार यांना फोनवर केला होता. काही आमदार माझ्या समवेत फोनवर बोलले. सत्तेत बहुमत असताना पुन्हा विरोधी पक्ष नेते फोडण्याचे काम केले, अशी टीका जयंत पाटील यांनी फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली.
राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने शरद पवारांसोबत – जयंत पाटील
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -