महाविकास आघाडीचे बोट फुटली आहे. अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. आम्ही त्यांचे स्वागत केले आहे. काही दिवसांपूर्वी ‘कोणी गुगली टाकली, कोणाचा क्लिन बोल्ड झाला याची चर्चा रंगली होती; पण आज सर्वांनी पाहिले की, हीट विकेट कोणाची गेली?, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला.