Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीमतदान कार्ड विकणे आहे :राजकीय भूकंपानंतर नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर टीकेचा आसूड

मतदान कार्ड विकणे आहे :राजकीय भूकंपानंतर नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर टीकेचा आसूड

रविवारी दुपारी राष्ट्रवादीचे जणांनी महाराष्ट्राच्या मंत्री पदासाठी दूरदर्शनवर झळकू लागली, आणि अनेकांची दुपारची झोप उडाली, अजितदादा पवार व इतर आठ
शपथ घेतली. ही बातमी घरोघरी अनेकांनी राजकीय घडामोडी पाहण्यात आजची दुपार आणि सायंकाळ घालवली, आणि मग या खुर्चीसाठीच्या राजकारणावर अनेकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकून तोंडसुख घेत आपला राग व्यक्त केला आणि काहींनी या राजकीय भूकंपावर विनोदी, मार्मिक पोस्ट टाकून काहीशी करमणूक पण केली. त्यात एकाने तर या असल्या राजकारणाला कंटाळून ‘“यापुढे मी मतदानच करणार नाही”..अशी टोकाची भूमिका घेतली, तर एकाने योग्य दरात माझे मतदान कार्ड विकणे आहे” अशी सोशल मिडियावर चक्क जाहिरातच दिली आहे.

आजच्या या राजकीय संगीतखुर्चीच्या खेळाने अनेकांची आज दुपारची झोप मोडली, त्यावर वैतागलेल्या एका नेटकऱ्याने “दादा पहाटे झोपू देत नाहीत, आणि आता दुपारी पण झोपू देईना झालेत, “ अशी मार्मिक तक्रार केली आहे. तर काहींनी या साऱ्या घडामोडीत मतदारांनाच आता कळेनासे झाले आहे, मी कोणत्या पक्षात आहे, अशी शंका पण व्यक्त केली आहे, तर आज एका नेटकऱ्याने मतदान कार्ड एका झाडाला गळफास लावून आत्महत्या करत असलेला व्हिडीओ तयार करून पाठवला आहे, व आपला राग व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोखाली लिहिलेय “सासूसाठी वेगळे झालो आणि सासूच वाटणीला आली” असे लिहून पुढील राजकारण कसे असेल याचा दाखला दिला आहे.

तर एका नेटकऱ्याने तर निवडणूक अयोगालाच एक विनंती केली आहे, आता येथून पुढे मतदान करतांना आमच्या बोटाला शाई लावू नका तर चुना लावत जा”, असा सल्ला दिला आहे. या सर्व राजकीय भूकंपाबद्दल एकाने काका पुतण्यावर मार्मिक टिप्पणी केली आहे. या पुतण्याच्या मागे काका नाहीत असे म्हणणाऱ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा‘असे म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. तर या वर्षात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या सर्वांनी सत्ता भोगलेली आहे, हे जळजळीत वास्तव पण सांगून टाकले आहे. एकंदरीत आजच्या राजकीय घडामोडीने सोशल मीडियावरील पोस्टने अनेकांची करमणूक झाली शिवाय काहींना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -