Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीब्रेक टेस्ट ट्रॅकमुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील वाहनधारकांची सोय

ब्रेक टेस्ट ट्रॅकमुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील वाहनधारकांची सोय

प्रत्येक चांगल्या कामाला सर्वजण मदत करतात आणि ते काम यशस्वी होते, याचे ब्रेक टेस्ट ट्रॅक उदाहरण आहे. प्रदीर्घ संघर्ष आणि अडथळे पार करत हा ट्रॅक सुरु झाला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. तर येत्या बुधवारपासून याठिकाणी वाहनाचे पासिंग काम सुरु होईल अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केली.

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेच्या वतीने स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते. शहापूर विश्रामगृह येथे आरटीओ कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न असून त्याला लवकरच शासनाची मान्यता मिळेल आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल असेही ते म्हणाले.

आमदार आवाडे यांनी, जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्येपैकी ४० टक्के वाहने इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यात आहेत. या वाहनांच्या पासिंगसाठी शहर व परिसरात ट्रॅक उपलब्ध नसल्याने सर्वांना कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. वाहनधारकांची होणारी ससेहोलपट लक्षात घेऊन आपण राज्य शासनाकडे तारदाळ येथील केएटीपी संस्थेची जागा उपलब्ध करुन स्वखर्चातून नियम व निकषानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करुन देण्याची तयारी दर्शविली.

पण तत्कालीन पालकमंत्री यांचे असहकार्य व चुकीच्या विधानामुळे तो उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होता. पण सर्व अडथळे पार करून हा ट्रॅक सुरु झाल्याने दोन्ही तालुक्यातील वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे. आता इचलकरंजी स्वतंत्र तालुका होण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासह वस्रोद्योग, पाणी प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. स्वागत व प्रास्ताविक केएटीपी संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी केले. सूत्रसंचालन शेखर शहा व केएटीपी चे कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी आभार व्हा. चेअरमन बाळासाहेब कलागते साहब कलागत यांनी केले.

याप्रसंगी प्रांताधिकारी अपर्णा बर्डे – चौगुले, अप्पर तहसीलदार मनोज ऐतवडे तारदाळ 5 सरपंच पल्लवी पोवार, प्रकाश मोरे, सुनिल पाटील, स्वप्निल आवाडे, डॉ. राहुल आवाडे, नंदा नंदा साळुंखे, प्रकाश’ लोखंडे, साताप्पा आदमापुरे, लियाकत गोलंदाज, अल्ताफ शेख, शशील धुर्वे, मन्सुर सावनुरकर, राम जाधव, ख्वाजा मुजावर, आनंदा गजरे, अनिल मण्णावर, पिंटु कासार, अनिल पाटील, अभय पाटील, महेश पाटील तसेच केएटीपी चे सर्व संचालक, कर्मचारी, इचलकरंजी शहर व परिसरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विविध वाहनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -