इचलकरंजी, येथील भारतमाता हौसिंग सोसायटीत घरात प्रवेश करून चोरट्यांनी तिजोरी ठेवलेले साडेसात लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पुष्पलता तानाजी पाटील (वय ४९) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भारतमाता हौसिंग सोसायटीत पुष्पलता पाटील या कुटुंबासह राहण्यास आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील तिजोरीची मोडतोड न करता नेहमीप्रमाणे ठेवलेली कपाटाची चावी घेऊन कपाट उघडून त्यातील ५ नेकलेस, २ तोळ्याचा राणीहार, ३ लक्ष्मीहार, ६ तोळ्याचे दोन गंठण प्रत्येक सव्वातोळ्याच्या तीन चेन, १ तोळ्याचे मिनी गंठण व कानातील टॉप्स असे सुमारे ७ लाख २६ हजार रुपयांचे दागिने ठेवले होते. मात्र २९ जुन रोजी दागिने तिजोरीत नसल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. पण दागिने न सापडल्याने शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.