Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

कोल्हापूर : हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या गुरुवार (ता. ६) पर्यंत तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या काळात जिल्ह्यातील काही भागात सुमारे १०० ते २०४ मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता आहे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.याची माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना देऊन बर्गे तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, पाण्याची पातळी आणि प्रवाह जास्त असल्याने काहीच बर्गे काढण्यात आले; पण बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी बंद झाले आहे. पाणी कमी झाल्यानंतर उर्वरित बर्गे काढले जाणार आहेत. जोराचा पाऊस झाला आणि पुन्हा पाणी वाढले जाऊन बर्गे काढण्यात अडचणी येऊ शकतील. अशी परिस्थिती आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरासह इतर ठिकाणी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू राहिला. मोठ्या पावसाची अपेक्षा असतानाही दमदार पावसाची वाट पाहावी लागत आहे.धरणांच्या पाणीपातळीत वाढ :धरण – क्षमता (टीएमसीमध्ये) – आजचा साठा (टीएमसीमध्ये)राधानगरी- ८.३६ -२.१२तुळशी- ३.४७-०.८४वारणा-३४.३९-११.३५दूधगंगा-२५.३९ -१.६८कसारी-२.७७-०.६९कडवी-२.५१ -०.८३कुंभी-२.७१-०.९४पाटगाव- ३.७१-०.९५

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -