Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीउपमुख्यमंत्री फडणवीस यांची आवाडे पिता-पुत्रांनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आवाडे पिता-पुत्रांनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मुंबई येथे आमदार प्रकाश आवाडे व माजी जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी भेट घेतली. राज्यातील नवीन राजकीय घडामोडींनंतर आवाडे यांच्या भेटीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस व आ. आवाडे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

आ. आवाडे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर आज तातडीने मुंबई येथे रवाना होऊन आ. आवाडे व राहुल आवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. आ. आवाडे हे मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार समजले जातात. नवीन राजकीय घडामोडीनंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून यामध्ये आ. आवाडे यांची वर्णी लागणार का, याकडे त्यांच्या समर्थकांसह शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -