Thursday, February 6, 2025
HomeइचलकरंजीIchalkaranji News शिवाजीनगर पोलिस स्टेशन ठरले राज्यातील सर्वोत्कृष्ठ पोलिस ठाणे

Ichalkaranji News शिवाजीनगर पोलिस स्टेशन ठरले राज्यातील सर्वोत्कृष्ठ पोलिस ठाणे

इचलकरंजी, शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हे राज्यातील सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे ठरले आहे. याबाबतची घोषणा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आज मंगळवार ता.४ रोजी झाली. राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे स्पर्धेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याला मान मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. लवकरच पोलीस ठाण्याला सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान केले जाणार आहे.

देशपातळीवर पोलीस पोलीस ठाण्याचा सन्मान केला जातो. सन २०२१ वर्षातील सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे स्पर्धेकरीता कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ठ पोलीस ठाण्यामधून राज्यस्तरावरील समितीने ५ पोलीस ठाण्यांची सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे २०२१ म्हणून घोषणा केली आहे. यामध्ये राज्यात तसेच कोल्हापूर जिल्हात शिवाजीनगर पोलीस ठाणे अव्वल ठरले आहे. तर नांदेड येथील देगलुर पोलीस ठाणे द्वितीय, छत्रपती संभाजीनगर शहर येथील बालुंज पोलीस ठाणे तृतीय, गोंदिया येथील अर्जुनीमोर पोलीस ठाणे चतुर्थ तर ठाण्यातील राबोडी पोलीस ठाणे पाचव्या क्रमांकावर आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्याचा मान मिळण्याकरता जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, शिवाजीनगरचे तत्कालीन निरीक्षक श्रीकांत पिंगळे, महादेव वाघमोडे त्याचबरोबर सद्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आदींचे विशेष प्रयत्न लाभले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -