बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने 2000 मध्ये बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, सुरूवातीला करीना कपूर हिच्या चित्रपटांना धमाका करण्यात अजिबात यश मिळत नव्हते. मात्र, असे असतानाही तिला सतत चित्रपटाच्या आॅफर येत होत्या.
करीना कपूर हिने ऋतिक रोशन याच्यासोबत यादे, मैं प्रेम की दीवानी हूं, कभी खुशी कभी गम, मुझसे दोस्ती करोगे अशा चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम देखील मिळाले.
यादरम्यान एक चर्चा होती की, ऋतिक रोशन याच्या प्रेमामध्ये करीना कपूर ही पडलीये. ऋतिक रोशन हा विवाहित असूनही त्याच्यावर प्रेम करीना कपूर ही करत होती.
ऋतिक रोशन आणि करीना यांच्या अफेअरच्या चर्चा देखील सुरू होत्या. त्यानंतर ऋतिक रोशन याच्या कुटुंबियांनी लक्ष देत या दोघांना वेगळे केले होते. मात्र, दोघांनीही कधीच त्यांचे रिलेशन मान्य केले नाही.
एका मुलाखतीमध्ये ऋतिक रोशन म्हणाला होता की, मला या चर्चांमुळे करीना कपूर हिचे वाईट वाटते. कारण ती खूप चांगली मुलगी आहे. करीना हिने देखील स्पष्ट केले होते की, ती कोणत्याच विवाहित व्यक्तीवर प्रेम करत नाही.