Ichalkaraji येथील मराठा हायकर्स इचलकरंजी तर्फे 15 व 16 जुलै 2023 रोजी पन्हाळा ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेस येणार्या महिला व युवतींसाठी जाण्या-येण्याची, राहण्याची खास सोय करण्यात आली आहे. तरी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. सदरची नोंदणी 12 जुलैपयरत करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेले कित्येक वर्षे जनमानसात राज्यातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती व्हावी याकरिता गडकिल्ले, जंगल पदभ्रमंती, सागरी किनारा पदभ्रमंती तसेच अनेक सामाजिक उपक्रम या हायकर्सतर्फे वर्षभर राबवले जातात. नाव नोंदणीसाठी मराठा हायकर्स द्वारा मंगळवार पेठ गांधी पुतळ्या शेजारी तसेच समर्थ प्रेस जे.बी. इलेक्ट्रॉनिक्स सुंदर बागेजवळ, सारंग कृषी सेवा केंद्र खोतवाडी, चैताली ग्राफीक्स विकली मार्केटजवळ व चंदूर, गायत्री प्लास्टिक डेक्कन मिल समोर, एन. सेव्हन विकली मार्केट, नॅशनल वॉच कंपनी जवाहर नगर तसेच सांगली पुणे मुंबई अमरावती या ठिकाणीही प्रवेशिका मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.