ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडमधल्या इतर अभिनेत्रींपेक्षा फार वेगळी आहे असं समजलं जातं. श्रद्धा जेव्हा कधी सार्वजनिक ठिकाणी पापाराझींना दिसते, तेव्हा तिच्या स्वभावातील आणि पोशाखांमधील साधेपणा चाहत्यांना खूप भावतो. श्रद्धाचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या चित्रपटांसोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. नुकतीच तिने ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत भूमिका साकारली. रणबीर आणि श्रद्धाची नवीन जोडी प्रेक्षकांनाही फार आवडली. त्यानंतर आता श्रद्धाच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाल्याचं कळतंय. कारण नुकतंच तिला ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाचा लेखक राहुल मोदीसोबत ‘मूव्ही डेट’वर जाताना पाहिलं गेलं. त्यामुळे श्रद्धाच्या आयुष्यात नवीन प्रेम आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लेखक राहुल मोदीसोबत श्रद्धा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. यावेळी पापाराझींनी दोघांना कॅमेऱ्यात कैद केलं. राहुल आणि श्रद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांच्या डेटिंगचा अंदाज लावला. याआधी श्रद्धा फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला चार वर्षांपर्यंत डेट करत होती. मात्र 2022 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. राहुल आणि श्रद्धाची पहिली भेट ही ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या सेटवरच झाली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.
ब्रेकअपनंतर श्रद्धा कपूरला भेटला नवीन बॉयफ्रेंड; ‘या’ हँडसम हंकला डेट करतेय अभिनेत्री
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -