ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : शिक्षण संस्थेत नव्याने सुरू केल्या जाणा-या हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी आवश्यक सुविधा असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी झाली होती. त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही रक्कम विभागीय शिक्षण सहसंचालक हेमंत कठरे आणि त्याचा स्टेनोग्राफर यांनी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने तिघांना अटक केली.
विभागीय शिक्षण सहसंचालक हेमंत नाना कठरे (वय ४६, सध्या रा. अंबाई डिफेन्स, कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय ३२, रा. पीरवाडी, ता. करवीर) आणि कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग (वय ३४, रा. राशिवडे, ता. राधानगरी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या पथकाने बुधवारी (दि. ५) दुपारी राजाराम कॉलेजच्या आवारातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदाराने मागणी केलेले तपासणी प्रमाणपत्र देण्यासाठी स्टेनोग्राफर प्रवीण गुरव याने विभागीय सहसंचालक प्रवीण कठरे यांच्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ती रक्कम कनिष्ठ लिपिक अनिल जोंग याच्याकडे देताना एसीबीने कारवाई करून तिघांना अटक केली. थेट विभागीय शिक्षण सहसंचालक एसीबीच्या कारवाईत अडकल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच या विभागातील लाचखोरी समोर आली आहे.
Kolhapur: शिक्षण सहसंचालक हेमंत कठरेंसह तिघे एसीबीच्या जाळ्यात, ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -