Friday, August 8, 2025
Homeब्रेकिंगGaneshotsav 2023 : गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! चार फुटांवरील POP च्या गणेशमूर्तींना...

Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! चार फुटांवरील POP च्या गणेशमूर्तींना परवानगी


गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) आता अवघा काही महिन्यांवर येऊन ठेपलाय. गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे 4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुंटापेक्षा कमी उंच्या मूर्तांसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना आजपासून ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचं ‘पीओपी’ बंदीचे विघ्न या वर्षी तरी टळलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ला पर्याय सुचवण्याबाबत गाईडलाइन अद्याप जाहीर झाली नसल्यानं मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षी चार फुटांवरील गणेशमूर्ती ‘पीओपी’ची वापरता येणार आहे. पण, 4 फुटांखाली मुर्ती मात्र शाडूच्याच मातीची असणं बंधनकारक असणार आहे. 

गणोशोत्सवाला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. आता मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकारण आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी आजपासून ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

पोओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. त्यामुळे उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून मंडळांकडून सरकारकडे ‘पीओपी’ला पर्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, जरी मार्गदर्शक सुट्ट्या जारी केल्या, तरी या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं आणि सरसकट करता येणार नसल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे.

दरम्यान, गणेशोत्सव तोंडावर आला असून महापालिकेच्या परवानग्या मिळवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. यंदा महापालिकेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -