बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिका होणार असल्याची माहिती दिली. ही वनडे मालिका आधी जून महिन्यात होणार होती. मात्र दोन्ही क्रिकेट बोर्डाच्या सहमतीने ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती. पूर्वी ही तीन सामन्यांची मालिका 23 जून ते 30 जून या दरम्यान होणार होती. आता ही मालिका जानेवारी 2024 मध्ये होणार आहे
.जय शहा यांनी शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या एपेक्स काऊन्सीलच्या बैठकीवेळी या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला. शहा यांनी देशातील द्विपक्षीय सामन्यांसाठी नव्या माध्यम हक्क करार प्रक्रिया ऑगस्टच्या अखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याची देखील घोषणा केली. हा करार पुढच्या चार वर्षासाठी असणार आहे.जय शहा म्हणाले की, ‘बीसीसीआयची नवीन माध्यम हक्क डील ही ऑगस्टच्या शेवटीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर आठ सामन्यांची ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होईल.
यात तीन वनडे सामने हे वर्ल्डकपपूर्वी आणि पाच टी 20 सामने हे वर्ल्डकप नंतर होणार आहेत.’शहा यांनी सांगितले की, बीसीसीआय एशियन गेम्स 2023 पूर्वी भारतीय वरिष्ठ महिला संघासाठीचा संपूर्ण कोचिंग स्टाफ हा निवडला जाईल. बीसीसीआय चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 मध्ये भारताचा पुरूष आणि महिला क्रिकेट संघ पाठवणार आहे.शहा म्हणाले, ‘आम्ही एशियन गेम्समध्ये सहभागी होणर आहे. एपेक्स काऊन्सीलने याबाबत परवानगी दिली असून आमचा पुरूष आणि महिला संघ चीनमधील एशियन गेम्समध्ये खेळणार आहे.