वर्षातून तीनवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ हप्ते आले आहेत. १४ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत.
ई-केवायसी करणं अनिवार्य
पीएम किसान योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास ई केवायसी करणं अधिक गरजेचं आहे. समजा तुम्ही अजूनही ईकेवायसी केली नसेल, तर यापुढे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु अजून त्यासाठी संधी उपलब्ध आहे. तुम्ही पीएम किसान पोर्टलवरती जाऊन ई केवायसी करु शकता. त्याचबरोबर तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन सुध्दा ही सगळी माहिती भरू शकता.
ई केवायसी कशी करायची ?
सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान वेबासाईटवरती जावं लागेलतिथं तुम्हाला समोरचं ईकेवायसी असा ऑप्शन दिसेल
तिथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर सर्चवरती क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आलेला ओटीपी तिथं द्यावा लागतो
त्यावेळी तुमची ईकेवासीची प्रक्रिया पुर्ण होते.
पीएम किमान योजनेचा फायदा घेण्यासाठी…
या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचं बँकेत खातं असणं गरजेचं आहे. जमीनीचे कागद, रहिवासी दाखला, त्याचबरोबर जमीनीची पडताळणी करणं सुध्दा गरजेचं आहे. वरीलपैकी एक जरी डॉक्युमेंट नसलं तरी त्या व्यक्तीला पीएम किसान योजनेचा फायदा मिळू शकत नाही.
एका लहान चुकीमुळे पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये बाहेर जाऊ शकता, अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -