Monday, July 28, 2025
Homeइचलकरंजीपंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ ; शिरोळ तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ ; शिरोळ तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली


राधानगरी धरण पाणलोटक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शिरोळ, कुंरूदवाड, तेरवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधार्‍याला जलपर्णी तटल्याने धोका निर्माण झाला आहे.

शिरोळ तालुक्यात अजूनही मान्सून सक्रिय झाला नसला तरी राधानगरी धरण पाणलोटक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे शिरोळ – कुंरूदवाड मार्गावर असणारा बंधारा पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्याला जलपर्णी तटल्याने धोका निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून जलपर्णी हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ते अपुरे पडत आहेत. तेरवाड बंधारा, कुंरूदवाड अनवडी पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -