मित्राची कार दुरुस्त करण्यासाठी इंजिनचा महागडा पार्ट आवश्यक होता. तो पार्ट मिळवण्यासाठी नामदेव सर्जेराव महाडिक (वय ३०, रा. महाडिकवाडी, पोस्ट कसबा ठाणे, ता. पन्हाळा) याने भाड्याने क्रेन मागवून कदमवाडीतून कार लंपासशाहूपुरी पोलिसांनी २४ तासात गुन्ह्याची उकल करीत महाडिक याला अटक करून चोरीस गेलेली कार आणि चोरीसाठी वापरलेली क्रेन ताब्यात घेतली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार संपतराव तोंडे-पाटील (रा. विठ्ठल मंदिर चौक, कदमवाडी, कोल्हापूर) यांच्या कारची कदमवाडी परिसरातून शुक्रवारी (दि. ७) चोरी झाली होती. तोंडे-पाटील यांच्या फिर्यादीनंतर गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार संदीप जाधव यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन चौकशी केली अता, दोन व्यक्ती क्रेनने कार घेऊन गेल्याचे समजले.
क्रेनच्या मालकाचे नाव मिळताच त्याच्याकडून संशयित नामदेव महाडिक याचे नाव मिळाले.
ताब्यात घेऊन अधिक चौकशीत करताच महाडिक याने कार चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चोरीतील कार आणि चोरीसाठी वापरलेली क्रेन जप्त केली. पोलिस अंमलदार मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.बंद कारवर नजर
फिर्यादी तोंडे-पाटील यांची कार गेल्या वर्षभरापासून एकाच ठिकाणी लावून होती. बंद अवस्थेत असलेली कार पाहून नामदेव महाडिक याने पार्टसाठी तिची चोरी करण्याचे नियोजन केले. कदमवाडीतून नागाळा पार्कात कार आणण्यासाठी क्रेनचालकास दीड हजार रुपये भाडे दिले. पार्ट काढून घेतल्यानंतर पुन्हा कार मूळ जागेवर सोडण्याचे ही नियोजन त्याने केले होते, अशी माहिती निरीक्षक सिंदकर यांनी दिली.
..अन् भाड्याने क्रेन लावून चोरली कार, मित्राच्या मदतीसाठी केला पराक्रम; कोल्हापुरातील घटना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -