शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आज पावसाने ओढ दिली. तुरळक सरींचा अपवाद वगळता पाऊस पडला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर पेरणी केलेल्या बियाणांच्या उगवणीलाही विलंब होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.पंचगंगा नदीची पाणीपातळी आज रात्री ९ वाजता १६ फूट ३ इंच इतकी होती.
गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात माॅन्सून सक्रिय झाला. सुरुवातीला धरणक्षेत्रात दमदार पाऊस बरसला. मात्र, गेल्या दोन दिवसांत पावसाने ओढ दिली आहे. धरणक्षेत्रातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. धरणातील पाणी साठा वाढत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ३३८ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र तो १२४ मिमी इतकाच झाला आहे.
कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची ओढ; पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -