ताजी बातमी ऑनलाईन टीम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतची युती का तुटली याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंना CM पदाचे आश्वासन दिले गेलेच नव्हते. त्या रात्री भाजप नेते अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली याचा खुलासा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्री भाजपचा होईल असा निर्णय झाला होता. तसेच अमित शाह यांनी शिवसेनेला जादा मंत्रीपदांची ऑफर दिली होती. ठाकरेंना अमित शाह यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता अस फडणवीस यांनी सांगितले. आम्ही जेव्हा जिंकत होतो, तेव्हा मी नागपुरातून उद्धव ठाकरेंना फोन केला होता की एकत्र पत्रकार परिषद घेऊ. यावेळी वहिनींसमोर पत्रकार परिषदेचा सराव केला. यानंतर मुख्यमंत्री पदाची चर्चा झाला. मला जेव्हा मध्यरात्री ठाकरेंचा फोन आला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले होते. मी शाहांना तेव्हाच फोन केला होता, त्यांनी तसे काही ठरले नसल्याचे सांगितले. मी परत उद्धव ठाकरेंना फोन करून हे सांगितले होते. तेव्हा त्यांनी युती शक्य नसल्याचे कळविले आणि एका झटक्यात युती तोडली.
2019 साली उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानी शिवाय याला दुसरं काही म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून मते मागीतले. त्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेद्वारांना जिंकवून देण्यासाठी घाम गाळला. शिवसेनेन भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे. अमित शहा म्हणाले दहा अपमान सहन कर पण बेईमानी सहन नको करुस. बेईमानी सहन करणारे राजकारणात टिकत नाहीत.
ठाकरेंना CM पदाचे आश्वासन दिलेच नाही, त्या रात्री शहांनी दिली होती ‘ही’ ऑफर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -