Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगनितीन गडकरी धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठं यश, मुख्य सूत्रधार आणि खतरनाक...

नितीन गडकरी धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठं यश, मुख्य सूत्रधार आणि खतरनाक दहशतवादी ताब्यात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. तब्बल तीन वेळा नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन धमकी देण्यात आली होती. प्रकारणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले होते, तसंच 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जयेश कांथा हा बेळगाव तुरुंगात होता, तुरुंगातातून त्याने फोन केल्याचंही समोर आलं होतं. नेत्यांच्या हत्येसाठी बेळगाव जेलमधून काही महिन्यांपूर्वी सुटलेल्या कुख्यात गुन्हेगारांना जयेशने आर्थिक मदत पुरवली. हत्येसाठी लागणारी हत्यारं मिळवून देण्यासाठी जेलमधून जयेशने मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

आता या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश आलं आहे. नागपूर पोलिसांनी बशिरुद्दिन नूर अहमत उर्फ अफसर पाशा या दहशतवाद्याला नागपूरात आणलं आहे. नागपूर पोलिसांनी अफसर पाशाला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन नागपुरात आणलं आहे. बशिरुद्दिन नूर अहमद उर्फ अफसर पाशा या दहशतवाद्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील धमकी प्रकरणात नाव समोर आलं आहे. तो कर्नाटकात लष्कर-ए-तोयबासाठी काम करतो. कर्नाटकातील चिकबल्लापुर इथं राहाणारा बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा वर ढाका आणि बंगलुरु बॉम्ब ब्लास्टसह जम्मू-काश्मीरात लष्कर-ए-तोयबासाठी दहशतवाद्यांची भरती करण्याचा आरोप आहे.

2006 पासून तो अटकेत आहे. 2014 पासून तो बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.. गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी उर्फ शाकिरने जानेवारी आणि मार्च महिन्यात दोन वेळेला धमकीचे फोन केले होते.. या मागचा सूत्रधार हा बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा असल्याच्या निष्कर्षापर्यंत नागपूर पोलीस पोहोचले आहेत.

बशिरुद्धीनेच 2014 पासून बेळगाव तुरुंगात असताना हळूहळू जयेश पुजारीचं ब्रेन वॉश करत त्याला कट्टर इस्लामिक विचारसरणीशी जोडले आणि त्यानंतर विविध देश विघातक आणि दहशतवादी कृत्यांसाठी जेलमधून फोन द्वारे बाहेर धमक्या देणे, संपर्क साधण्यासाठी वापरलं. जयेश पुजारीची महिला मित्र आणि बेळगाव तुरुंगातील काही कैद्यांनी नागपूर पोलिसांना खात्रीलायक माहिती दिल्यानंतर त्या आधारावरच नागपूर पोलिसांनी गडकरी यांच्या कार्यालयातील धमकीच्या फोन प्रकरणी मुख्य सूत्रधार बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा असल्याचा निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -