Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगकोल्हापूरकडे दुसऱ्यांदा आले वैद्यकीय शिक्षण खाते ; पहा कोणाला मिळाले खाते..

कोल्हापूरकडे दुसऱ्यांदा आले वैद्यकीय शिक्षण खाते ; पहा कोणाला मिळाले खाते..


कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला वैद्यकीय शिक्षण आणि
अर्थसाहाय्य या खात्याची जबाबदारी पडली आहे. त्यांचा मात्र ग्रामविकास किंवा सहकार खाते मिळावे, यासाठी प्रयत्न होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांनी यापूर्वी सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खात्याचा (२००० ते २००४) कार्यभार सांभाळताना कोल्हापूरला शाहू महाराज यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. त्यांच्यामुळेच हे महाविद्यालय होऊ शकले.

मुश्रीफ यांनी यापूर्वी पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्रिपद, तर कामगार, विशेष साहाय्य. विधी न्याय, जलसंपदा आणि ग्रामविकासमंत्री म्हणून ठसा उमटविणारे काम केले आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. थेट जनतेशी संबंधित खाते मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यामुळेच त्यांना सहकार किंवा ग्रामविकास खाते हवे होते. त्यातही ग्रामविकाससाठीच ते जास्त प्रयत्नशील होते. हे खाते भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील नेते गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खाते मुश्रीफ यांना देऊन ग्रामविकास त्यांच्याकडेच ठेवले आहे. त्यातही खातेवाटप करताना राष्ट्रवादी डोईजड होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -