कोल्हापूर : पंजाब पोलिसांना (Punjab Police) हवा असलेल्या जग्गू भगवान पुरिया टोळीतील शार्प शूटरला पंजाब आणि कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) रंकाळा येथील धुण्याच्या चावीजवळ आज अटक केलीदीपक ऊर्फ परवेश ईश्वरसिंग राठी (वय ३२, रा. खरहर, जि. जझ्झर, हरियाना) असे त्याचे नाव आहे. तो देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) टोळीविरोधातील आहे. खून, खुनाचा प्रयत्न यासह अन्य गुन्हे असलेल्या राठीला दहा वर्षे शिक्षा झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील जग्गू भगवान पुरिया गँगचा शार्प शूटर दोन गंभीर गुन्हे करून २५ मे २०२३ पासून फरार होता.
त्याच्या भागातील आणि दूरचे काही नातेवाईक पैलवानकीसाठी कोल्हापुरात रंकाळा परिसरात राहण्यास आले आहेत. त्यामुळे राठी कोल्हापुरात आल्याची माहिती अमृतसर पोलिसांना मिळाली होतीत्यांनी कोल्हापुरात येऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली आणि त्यांना गुन्हेगाराविषयी माहिती दिली. पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी त्यांना सहकार्य केले. अमृतसर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले होते.
त्यांच्याकडे शार्प शूटर राठी रंकाळा परिसरातील धुण्याची चावी परिसरात राहत असल्याची माहिती होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून राठी याला तेथून ताब्यात घेतले. त्यानंतर अमृतसर पोलिस त्याला घेऊन पंजाबकडे रवाना झाले.अमृतसर पोलिस दलातील निरीक्षक अमरदीपसिंग, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील उपनिरीक्षक शेष मोरे, कॉन्स्टेबल नितीन चोथे, प्रशांत कांबळे, निवृत्ती माळी, अनिल जाधव, नामदेव यादव यांनी कारवाईत सहभाग घेतला.रेकॉर्डवरील गुन्हेगार…एका खुनाच्या गुन्ह्यात राठीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. पंजाबमधील ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्यात राठीवर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. बिष्णोई गँगचा सदस्य रौनितसिंग ऊर्फ सोनू मोटा याच्यावर २१ मे रोजी गोळ्या झाडून त्याला गंभीर जखमी केले होते.
त्यामुळे त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा नोंद आहे. तसेच २४ मे रोजी जनरलसिंग याचा गोळ्या घालून खून केला. त्यानंतर राठी फरार होता. त्याला आता कोल्हापुरात अटक केली.लिंकिंग परदेशात अन् मुक्काम कोल्हापुरातपुरिया गँगला कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलियातून आर्थिक मदत होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे राठी परदेशात जाण्याची शक्यता होती, तरीही तो कोल्हापुरात दोन जूनपासून राहत आहे. रंकाळा परिसरातील धुण्याच्या चावीच्या परिसरात त्याच्या गावाकडील आणि काहीजण पैलवनकीसाठी कोल्हापुरात आहेत. तसेच काही लांबचे नातेवाईकही येथे आहेत. त्यामुळेच तो येथे आल्याचे पोलिसांनी सांगितले.