संपूर्ण भारतासाठी अभिमान वाटावा अशा ‘चांद्रयान-3’ने आकाशात झेप घेतली. ‘इस्रो’च्या या मोहिमेमध्ये सांगली, जळगाव आणि बेळगावनेही मोलाचे योगदान दिले.सांगली येथील संदीप सोले यांच्या कारखान्यात या रॉकेटला कोटिंग केले आहे. सोले यांची झेल कंपनी इस्रो आणि संरक्षण दलास लागणार्या क्षेपणास्त्रे व मिसाईलला कोटिंग करण्याचे काम करते. यान आणि रॉकेट याचे संरक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी कोटिंग महत्त्वाचे असते. चांद्रयानाच्या रॉकेटसाठीच्या भागाचे कोटिंग येथील माधवनगरमधील कंपनीत झाले आहे.
जळगावातील एचडी वर्षा नोझल्स
चांद्रयान मोहिमेच्या ‘लाँच पॅड’मध्ये जळगावातील एचडी फायर प्रोटेक्ट या कंपनीत उत्पादित नोझल्स वापरले आहेत. यानाचे प्रक्षेपण होताना अत्याधिक आवाज आणि व्हायब्रेशन तयार होतात. यामुळे चांद्रयान आणि त्यामधील विविध उपकरणांना धोका संभवू शकतो. त्यामुळे हा आवाज विशिष्ट मर्यादेच्या आत राखणे गरजेचे असते. या नोझल्स प्रणालीत प्रती मिनीट अडीच लाख लिटर या वेगाने पाण्याचे फवारे बाहेर पडतात. त्यामुळे हा आवाज नियंत्रित करता येतो. यासाठी जळगावमध्ये उत्पादित झालेले 88 नोझल्स वापरण्यात आले आहेत.सुटे भाग बनविले बेळगावात
‘चांद्रयान-3’चे काही सुटे भाग बेळगावात बनल्याचे स्पष्ट झाले आहे. इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स (संवेदक), बहुस्तरीय व्हॉल्व्ह, बहुस्तरीय ब्लॉक, स्पूल्स आदी भाग बेळगावच्या सर्वो कंट्रोल्स कंपनीमध्ये बनलेले आहेत. ते चांद्रयानात वापरले गेले आहेत. सर्वो कंट्रोल्स एरोस्पेस नावाने ही उपकंपनी कार्यरत असून, ती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) उपग्रहांचेही सुटे भाग बनवते.
महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी सांगलीत कोटिंग, जळगावाचे नोझल्स
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -