लक्ष्मीपुरी भाजी मार्केट, दसरा चौक बस स्टॉप, गंगावेश बाजारपेठ या परिसरात खरेदीसाठी आलेल्या लोकांचे चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. सोमवारी एकाच दिवशी दहा मोबाईल गेल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमधून सुभाष शंकरराव बोधे (वय ५२
रा. सानेगुरुजी), एकनाथ ईश्वर एकबोटे (वय ६० रा. राजारामपुरी १३ वी गल्ली), सुरेश परशराम कोळी ( वय ५३ रा. उजळाईवाडी), बालचंद उमराव नागरगोजे ( वय ४२ रा. आर. के. नगर) यांचे मोबाईल चोरीस गेले. तर दसरा चौकात एस. टी. बसमध्ये चढत असताना प्रतिक दशरथ सकटे (वय २१ रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) याचा मोबाईल चोरीस गेला. बाळकृष्ण महादेव चौगले (वय ५५ रा. रंकाळा टॉवर) याचा कॉमर्स कॉलेज परिसरातून १४ हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेला. अशा प्रकारे दहा मोबाईल चोरीस गेले आहेत.