Friday, June 21, 2024
Homenewsगुलाब पाठोपाठ आता शाहीनचा धोका वाढला, महाराष्ट्राला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

गुलाब पाठोपाठ आता शाहीनचा धोका वाढला, महाराष्ट्राला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा


गुलाब चक्रीवादळ शमताच आगामी २४ तासांत अरबी समुद्रात ‘शाहिन’ (shaheen cyclone) नावाच्या नव्या चक्रीवादळाची निर्मीती होणार असल्याचा हवामान शास्त्र विभागाने म्हटलं आहे. या नव्या चक्रीवादळामुळे ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळाचे रुपांतर बुधवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. तो पट्टा अरबी समुद्राकडे सरकला असून, त्यापासून आणखी एक नवे शाहिन नावाचे चक्रीवादळ ३० सप्टेंबर रोजी सकाळी तयार होणार आहे.
त्यामुळे पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.हे चक्रीवादळ पुढे १ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानकडे सरकणार आहे.मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रावर पुढचे चार दिवस राहणार आहे.

तौक्ते नंतर शाहीन दुसरे वादळ
उत्तर अरबी समुद्रात गुरुवारी ३० रोजी पहाटे शाहिन चक्रीवादळाची निर्मीती होणार आहे.यंदाच्या हंगामात तौक्ते वादळाची जूनमध्ये अरबी समुद्रात निर्मिती झाली होती. त्या वादळाने कोकण किनरपट्टीला मोठा फटका बसला होता. त्या पाठोपाठ शाहीन हे दुसरे वादळ अरबी सुद्रात तयार होणार आहे. त्यामुळे पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -