Monday, December 23, 2024
Homeक्रीडाWI vs IND 2nd Test | विंडिज-टीम इंडिया दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची...

WI vs IND 2nd Test | विंडिज-टीम इंडिया दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूची एन्ट्री


टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभयसंघात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात विंडिजवर तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 साखळी फेरीची शानदार सुरुवात केली. टीम इंडियाकडून या सामन्यात डेब्यूटंट यशस्वी जयस्वाल, कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन या चौकडीने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता टीमने संघ जाहीर केला आहे.

विंडिजने दुसऱ्या कसोटीसाठी 13 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तर 2 राखीव खेळाडूंचा समावेश केलाय. विंडिजने टीममध्ये एकमेव बदल करण्यात आलाय. विंडिजने दुसऱ्या कसोटीसाठी केविन सिंक्लेयर याला टीममध्ये घेतलंय. केविनची टीममध्ये संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरलीय.

ऑलराऊंडर असलेल्या केविन सिंक्लेयर याला रेमन रीफर याच्या जागी संधी देण्यात आली आहे. रेमन पहिल्या सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला होता. केविन याने पहिल्या कसोटीत टीम इंडिया विरुद्ध पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 11 अशा एकूण 13 धावाच केल्या होत्या.

टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी वेस्ट इंडिज

क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), अलिक अथानाझे, टॅगेनरीन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केमर रोच, केविन सिंक्लेअर आणि जोमेल वॅरिकन.

राखीव खेळाडू – टेविन इम्लाच आणि अकीम जॉर्डन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -