जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गुळदगड (वय 45 रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आटपाडी तलावात पाणी पातळी कमी झाल्याने विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी हे दोघेजण गेले होते.
यावेळी विजेचा शॉक बसला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. आटपाडी तलावातून शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी पाइपलाइन करून पाण्याची सोय केली आहे. माडगुळे येथील सोमनाथ विभुते आणि मधुकर विभुते यांच्यासह चार पाच जणांची सामुदायिक पाइपलाइन आहे.
तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने विद्युत मोटर पुन्हा पाण्यात बसवावी लागत आहे गुरुवारी दुपारी सोमनाथ विभुते यांनी अनिकेत विभुतेला ही मोटर ड्रायव्हिंग पाण्यात सोडण्यासाठी जाऊ, असं सांगण्यासाठी फोन केला. यावेळी अनिकेतने मी आटपाडी येथे आहे. तुम्ही येऊ नका मी मोटर बसवतो असं सांगितलं.त्यानंतर अनिकेत विभुते हा पंढरपूर तालुक्यातील शेवते गावातून आलेल्या विलास गुळदगड आणि सखाराम पाटील या नातेवाइकांना घेऊन तलावावर गेला. सखाराम पाटील हे बांधावर थांबले. तलावाच्या बांधावरून अनिकेत विभुते आणि विलास गुळदगड यांनी विद्युत मोटर पाण्यात ठेवली. यावेळी दोघांना अचानक विजेचा शॉक बसला आणि ते पाण्यात पडले. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
‘तुम्ही येऊ नका मी आहे’ म्हणत वडिलांना थांबवून स्वतः मोटर पाण्यात ठेवायाला गेला अन्.., 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -