2024 ची लोकसभा निवडणूक… उरलेत अवघे काही महिने… या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधणीला सुरुवात केली आहे. काही दिवसांआधी NDA ची दिल्लीत बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर INDIA अर्थात विरोधी पक्षांची कर्नाटकातील बंगळुरूमध्ये बैठक पार पडली. यात आगामी निवडणुकीबाबत रणनिती ठरवण्यात आली. आता भाजपने एका नव्या मिशनची घोषणा केली आहे.
‘घर चलो अभियान’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘घर चलो अभियान’ घोषणा केली आहे. या अंतर्गत मोदी सरकारने मागच्या नऊ वर्षात केलेल्या कामांना जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट जसंच्या तसं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या दुरदृष्टीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे आज देशातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वात आज देश प्रगतीपथावर यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. आदरणीय मोदीजींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या केंद्र सरकारच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी व त्यांच्या नेतृत्वाप्रती समर्थन मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने “घर चलो अभियान” राबवले जात आहे.
याच “घर चलो अभियान” अंतर्गत उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही, उमरेड व भिवापूर या तिन्ही तालुक्यातील ११ गावांना भेट दिली. दौऱ्याची सुरुवात कुही तालुक्यातील तितूर येथून केली, त्यानंतर कुही, चापेगडी, वेलतूर, मांढळ या गावांना तर उमरेड तालुक्यातील आपतूर, मकरधोकडा, बेला, सिर्सी, उमरेड व भिवापूर तालुक्यातील नांद या गावांना भेटी देत ५००० हून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यानिमित्ताने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली. त्याचबरोबर ९०९०९०२०२४ या क्रमांकावर कॉल करून मोदीजींना समर्थन देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
यावेळी आबालवृद्धांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाविषयी प्रचंड विश्वास दिसून आला. मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला. आज या अभियानाच्या निमित्ताने अतिशय सुखद अनुभव मिळाला.
यावेळी माझ्यासोबत नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, आनंदराव राऊत, रुपचंद कडू, भाजयुमो नागपुर ग्रामीण ज़िलाध्यक्ष आदर्श पटले, विवेक सोनटक्के, डॉ. शिरीष मेश्राम, रजनी लोणारे, माया पाटील, प्रमोद घरडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अतिशय उत्साहात व प्रेमाने नागरिकांनी स्वागत केले त्या सर्वांचे व सहभागी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नवं मिशन!; ‘घर चलो अभियान’ची घोषणा, नेमकं काय आहे हे मिशन? जाणून घ्या…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -