Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंग‘मन की बात’ ओळणारे बाबा बागेश्वर इतक्या संपत्तीचे धनी

‘मन की बात’ ओळणारे बाबा बागेश्वर इतक्या संपत्तीचे धनी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लोकांचे मन वाचणारे, मनातील ओळखणारे बाबा म्हणून सध्या बाबा बागेश्वर हे लोकप्रिय आहेत. मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढागंज नावाचे गाव आहे. येथे त्यांचा दिव्य दरबार भरतो. खास बुंदेली लयीत ते बोलतात. त्यांचा कथेला आणि इतर धार्मिक कार्यक्रमाला मोठी गर्दी होते. त्यांचे नाव धीरेंद्र कृष्ण शास्त्री असे आहे. देशातच नाही तर पाकिस्तान आणि युरोपात सुद्धा बाबाचा बोलबाला आहे. मनातील गोष्ट ओळखतात म्हणून देशात मोठे वादंग उठले होते. बाबा बागेश्वरविरोधात नागपूरमध्ये अंनिसच्या प्रयत्नानंतर गुन्हा पण दाखल झाला होता. बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप पण सातत्याने होतो. तसेच माईंड रिडिंग करण्यात ते तज्ज्ञ असल्याचे मत आहे. अनेक जणांनी त्यांची परीक्षा पण घेतली. तर सतत चर्चेत असलेले बाबा बागेश्वर किती कमाई करतात हे माहिती आहे का? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री अक्षरा सिंह बाबाच्या दिव्य दरबारात पोहचली होती. तिची एकूण कमाई 25 कोटींच्या घरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षरा सिंह पेक्षा बाबांची कमाई थोडी कमी आहे. बाबा बागेश्वर हे 19.50 कोटींचे मालक आहेत. कथा, प्रवचन आणि मनातील गोष्ट ओळखण्यात, सध्या सुरु असलेले विचार वाचण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या दिव्य दरबारात भाविक मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात. बाबाची एक कथा जवळपास 15 दिवस चालते. त्यासाठी ते एक ते दीड लाख रुपये घेतात.

दर महिन्याला 3.5 लाखांची कमाई

बाबा बागेश्वर दर महिन्याला 3.5 लाख रुपये सहज कमाई करतात. तर रोज जवळपास आठ हजार रुपये कमाई करतात. त्यांच्याकडे गावात एक जुने घर, हनुमानाची गदा, एक पेला सतत सोबत असतो.

चमत्काराचा दावा

बाबा मनातील विचार, गोष्ट सहज ओळखतात. देशभरातून त्यांच्या टीका ही होते. पण त्यांच्या भाविकांची संख्या यामुळे कित्येक पटीने वाढली आहे. त्यांचे भक्त हा चमत्कार असल्याचा दावा करतात. स्वतः बाबा मात्र असा कोणताही दावा करत नाही. पण सर्वांसमोर एखाद्याचे नाव घेऊन, ती व्यक्ती मंडपात कोणत्या दिशेला आहे हे सांगून त्याची माहिती एका कागदावर लिहितात. त्यात ती व्यक्ती कोणती समस्या घेऊन आली याची माहिती ते अगोदरच लिहून ठेवतात. त्यांच्यावर ईश्वराची कृपा असल्याचा दावा बाबा करतात.

कोण आहेत बाबा

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्यप्रदेशातील छत्तरपूरजवळील गडागंज गावात झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब या गडागंजमध्येच राहते. याठिकाी प्राचीन बागेश्वर धामचे मंदिर आहे. त्यांचे आजोबा पंडित भगवान दास गर्ग (सेतु लाल) हे पण याच गावात राहतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -