पुढील 3-4 तासांत सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या.दुपारी दोन वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी
40ʼ05” (542.51m)विसर्ग : 60106 cusecs(पंचगंगा नदी इशारा पातळी 39’00” व धोका पातळी – 43’00”)एकूण पाण्याखालील बंधारे -: 8
राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले
आज सकाळपासून राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले गेले आहेत. दुपारी 1.23 वाजतास्वयंचलित द्वार क्रं 7 उघडले आहे.एकूण 5 द्वारे उघडी ( 3,4,5,6 & 7)विसर्ग : पाच दरवाज्यातून 7140 क्यूसेसपाॅवर हाऊसमधून 1400 क्यूसेस एकूण विसर्ग : 8540 क्यूसेस सुरू आहे.राधानगरी धरणाचे चारच दरवाजे सुरु; अफवा न पसरवण्याचे आवाहन
आज 26 जुलै 2023 दुपारी 1 वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे 4 च दरवाजे सुरु आहेत. मात्र, सर्व दरवाजे सुरु झाल्याची अफवा पसरवली जात आहे. परंतु, सध्या धरणाचे 4 च दरवाजे सुरु आहेत.
चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; २४११ क्युसेक विसर्ग सुरू
धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असल्याने चांदोली धरण ८१.२७ टक्के भरले आहे. आज बुधवारी सकाळी ११. ४५ मिनिटांनी धरण दरवाजामधून १५०० व विद्युत निर्मितीमधून ९११ असा एकूण २४११ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.