Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानऑगस्टपासून डब्यात जाणार हे स्मार्टफोन! तुमचा मोबाईल तर यात नाही ना…!

ऑगस्टपासून डब्यात जाणार हे स्मार्टफोन! तुमचा मोबाईल तर यात नाही ना…!


स्मार्टफोन..ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षणांचा सोबती हा स्मार्टफोन असतो. प्रत्येक गोष्ट पाहण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी स्मार्टफोन मित्राची भूमिका बजावतो, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुले कंपनी वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करत असते. पण गुगलच्या एका निर्णयाने लाखो स्मार्टफोन वापरकर्त्यांना फटका बसणार आहे. कारण गुगलने अँड्रॉईड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तुमच्याकडेही किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम असलेला फोन असेल तर फटका बसू शकतो. गुगलने 10 वर्षांपूर्वी आणलेल्या अँड्रॉईड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट किंवा अपडेट देण्यास नकार दिला आहे. गुगलचं यापुढे सर्वाधिक लक्ष हे सुरक्षित अँड्रॉईड वर्जनवर असणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना सुरक्षित अनुभूती घेता येईल.

अँड्रॉईड डेव्हलपर्स ब्लॉगमधये गुगलने एक अधिकृत घोषणा करत लिहिलं आहे की, “येत्या काही दिवसांपासून किटकॅट वर्जनसाठी गुगल प्ले सर्व्हिस सपोर्ट बंद करणार आहे.” गुगलने या वर्जनच्या घटत्या वापरकर्त्यांचा संदर्भ देत ही माहिती दिली आहे. सध्या किटकॅट ऑपरेटिंग वर्जन वापरणारे 1 टक्के लोकं आहे. यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे.

किटकॅट (API levels 19 & 20) वर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनना ऑगस्ट 2023 पासून गुगल प्ले सर्व्हिस अपडेट मिळणार नाहीत. त्यामुळे गुगल किटकॅट अपडेट बंद का करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंपनीने 2013 मध्ये अँड्रॉईड किटकॅट ओएस वर्जन रिलीज केलं होतं. तेव्हा या ऑपरेटिंग सिस्टमची लोकप्रियता खूप होती.

वेळेनुसार तंत्रज्ञानात बदल होत गेले आणि किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम मागे पडलं. आता किटकॅट सिस्टम खूपच जुनी झाली आहे. ऑपरेटिंग सिस्टममध्ये नव्या सुरक्षा आणि सुधारणा करणं अवघड आहे. त्यामुळे किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


तुमच्याकडे किटकॅट वर्जन असलेला स्मार्टफोन असेल तर अँड्रॉईडचं नवं वर्जन घ्या. तुम्ही अँड्रॉईड 10 आणि त्यावर चालणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही नवा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. नव्या ऑपरेटिंग सिस्टममुळे सायबर अटॅक किंवा ऑनलाईन फसवणूक टाळण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -