पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या चौदाव्या हप्ताची शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून वाट पाहत आहेत. मात्र आज शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण आज PM किसान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला जाणार आहे अशी माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे.
PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे 6000 रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत या योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील 85 लाख 66 हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारणत: 1 हजार 866 कोटी 40 लाख रुपये इतका लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे चेक करा PM किसान योजनेची लिस्ट
सर्वप्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. येथे Beeficiary List वर क्लिक करा.
यानंतर स्टेट बॉक्समध्ये तुमच्या राज्याचे नाव निवडा. डिस्ट्रिक्ट फील्डमध्ये तुमचा जिल्हा निवडा, नंतर तुमच्या तालुक्याचे नाव. त्याच्या ब्लॉकचे नाव भरा आणि नंतर Get Report वर क्लिक करा. तुम्हाला पीएम किसानच्या लाभार्थींची यादी मिळेल तेथे तुम्ही चेक करू शकता.