Friday, November 22, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र वन विभागाअंतर्गत विविध पदांची भरती, कोणतीही परीक्षा नाही

महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत विविध पदांची भरती, कोणतीही परीक्षा नाही

तुम्हाला प्राण्यांची आवड आहे का? जंगलात फिरायला तुम्हाला आवडत का? असं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण महाराष्ट्र वन विभागामार्फत विविध पदांची भरती करण्यात येत असून येथे दहावीपासून पदवीधरांना नोकरी मिळणार आहे. वन्यजीव, प्राणीशास्त्र, निसर्ग या गोष्टींची आवड असेल तर तुम्ही येथे मन लावून काम करु शकाल. कायम तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करायला मिळेल. या पदभरतीचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.


महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यात एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम या पदांवर ही भरती केली जाणार आहे.बचाव मदत टीममध्ये 4 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्यांच्याकडे एमएचसीआयटीचे प्रमाणपत्र असावे. उमेदवाराकडे वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 10 हजार रुपये इतका पगार दिला जाईल.


यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मुलाखत होणार आहे. उमेदवारांना पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे उपस्थित राहावे लागणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -