कराड रस्त्यालगत असणाऱ्या ओलंपिया सप्लिमेंट शाॅपमध्ये नशेची औषधे विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी पसार असलेल्या सराईत गुंड संदीप शामराव जाधव (रा. सावंतपूर, ता. पलूस) याला पलूस पोलिसांनी अटक केली.चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे सापळा रचून ही कारवाई केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्याचा साथीदार वैभव भानुदास लिंबकर (रा. पलूस) सध्या अटकेत आहे.
अधिक माहिती अशी की, दि. २५ जुलै रोजी सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास पलूस पोलिसांनी तासगाव- कराड रस्त्यालगत असलेल्या ओलंपिया सप्लिमेंट शाॅपवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांना नशेच्या औषधाचा १० हजार ७२० रुपये किमतीचा साठा आढळला. ४० सीलबंद बाटल्या विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. त्या जप्त केल्या.
पोलिसांनी वैभव लिंबकर याला अटक केली होती. तर संदीप जाधव हा फरारी झाला होता. त्याला चिपळूण येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
Sangli : नशेच्या गोळ्यांची विक्री, पलूसला गुंडास अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -