ताजी बातमी ऑनलाईन टीम
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेची जोरदार तयारी सुरु असताना आता टी 20 वर्ल्डकपचेही वेध लागले आहे. वनडे वर्ल्डकप दर चार वर्षांनी येतो. तर टी 20 वर्ल्डकप दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. त्यामुळे 2022 नंतर आता 2024 टी वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. ही वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे. यासाठी अमेरिकेतील काही मैदानांचं परीक्षण केलं गेलं आहे. कारण आयसीसीची एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेत होत आहे. त्यामुळे फ्लोरिडा, मॉरिसविले, डलासस आणि न्यूयॉर्क या शहरांची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेत स्पर्धेचं आयोजन करून तिथे क्रिकेटची पायाभरणी करण्याचा हेतू आयसीसीचा आहे. अमेरिकेत अजूनही क्रिकेटबाबत हवा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. या माध्यमातून क्रिकेटप्रति प्रेम वाढण्याचा हेतू आहे
कसं असेल टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा ?
टी-20 विश्वचषकाचे हा नववं पर्व असणार आहे. या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी एकूण 20 संघामध्ये सामने होणार आहेत. 20 संघाना 5 गटात विभागले जाणार आहे.तर प्रत्येक गटातील टॉप 2 संघांना सुपर 8 मध्ये खेळणयाची संधी मिळेल. या सामन्यांच्या वेळ,तारिख,मैदान याविषयी अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण टी 20 वर्ल्डकप 2024 ही स्पर्धा 4 ते 30 जून या दरम्यान खेळवली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत 27 दिवसांत तब्बल 55 सामने खेळवले जाणार आहेत.
आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी आतापर्यंत एकूण 15 संघांनी क्वालिफाय केलं आहे. तसेच उर्वरीत पाच जागांसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी टी 20 वर्ल्ड कप 2022 मधील पहिल्या 8 टीम्ससह आयसीसी रँकिंगमधील टॉप 10 मधील 2 संघ थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे. तसेच यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही संघांनाही डायरेक्ट एन्ट्री मिळाली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी 27 जुलैला दोन संघ पात्र ठरले. डेनमार्कवर 33 धावांनी विजय मिळवत स्कॉटलँडने क्वालिफाय केलं. तर जर्मनी विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंडने वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं.
T20 WORLD CUP 2024 चं वेळापत्रक जाहिर! कुठे कधीपासून सुरु होणार स्पर्धा ते जाणून घ्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -