राज्य सरकारने इचलकरंजी शहरासाठी सुळकूड उद्भव धरून दूधगंगा नदीतून पाईपलाईनद्वारे मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेस मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कागलमधील विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी तीव्र विरोध केला आहे. इचलकरंजीची पाणी पुरवठा योजना रद्द करू यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी भूमिका घेतली आहे. मुश्रीफ हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी इचलकर ंजीच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करून तसेच योजनेची सत्यता पडताळून निर्णय घेणे अपेक्षित आहे.
मात्र त्यांनी थेट या योजनेला विरोध केल्याने शहरवासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत
स्वतःला राजे म्हणून घेणारे समरजितसिंह घाटगे हे स्वतःचे राजकारण टिकविण्यासाठी इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध करत आहेत. ही वृत्ती राजेंना शोभनिय आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे.
आहेत.
त्यामुळे पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी इचलकरंजीतील सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी एकत्र येऊन ताकद दाखवून देणे काळाची गरज बनली आहे तरच इचलकरंजीचा पाणीप्रश्न कायमचा सुटू शकेल, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण आणि कृष्णा नळपाणी योजनेला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे इचलकरंजी शहराला वारणा नदीतून दानोळी येथून पाणीपुरवठा योजनेला मंजूरी दिली मात्र, राजकीय कुरघोडी आणि वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही
योजना
रद्द करावी लागली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना इचलकरंजीसाठी मुळकूड उद्भव धरून दूधगंगा नदीतून पाणी योजनेस मंजुरी दिली. त्यासाठी तो निधी मंजूर करून या योजनेच्या कामासाठी निविदाही काढण्यात आल्या.
दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांचा विरोध मावळण्याच्या दृष्टीने विविध राजकीय पक्ष स्तरावर प्रयत्न झाले. त्याला बऱ्यापैकी यशही आले आहे. मात्र, मध्यंतरी घडलेल्या राज्यस्तरीय घडामोडीत राष्ट्रवादीतील एक गट सत्तेत सहभागी झाला.
या राजकीय घडमोडीमध्ये मताच्या जोगव्यासाठी इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींना
मुश्रीफ यांनी योजना पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा!
सुळकूड पाणी योजनेमधून शेतकऱ्यांच्या एकाही पाण्याच्या थेंबाला धक्का लागणार नाही, असे शासकीय माहितीच्या आधारे सांगणारे अभ्यासू नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी विविध स्तरावर अभ्यासपूर्ण मांडणी करून पटवून देण्याचा प्रयत्न केला. नाम. मुश्रीफ यांनी, योजनेला विरोध करण्यापूर्वी इचलकरंजीतील लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात घेऊन योजना पूर्णत्वास नेणे अपेक्षित होते.
विश्वासात न घेता अथवा त्यांची मते जाणून न घेता नाम हसन मुश्रीफ यांनी दूधगंगा पाणी पुरवठा योजनेस विरोध दर्शविला. त्याला खास. संजय मंडलिक, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, माजी आम. के. पी. पाटील, माजी आम. संजय घाटगे यांनीही सहमती
दर्शविली. या निर्णयामुळे इचलकरंजी शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये शहर परिसरातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी लागत असताना इचलकरंजीच्या पाणी पुरवठा योजनेला सातत्याने विरोध का केला जातो, हे न सुटणारे कोडे बनले आहे.
मुख्यमंत्री अपेक्षा पूर्ण करतील
इचलकरंजी शहरवासियांना येथील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाण्याच्या प्रश्नाबाबत कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हेच प्रयत्न करतील अशी शेवटीची अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे.